आॅफलाइन की आॅनलाइन

 

परवा दुपारी बातम्या लावल्या परीक्षा आॅनलाइन पाहिजेत, आॅफलाइन नको. काही तर परीक्षाच नको, म्हणून पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद येथे चाललेले आंदोलन बघून मन सुन्न झाले.

परीक्षा अगदी जवळ येऊन ठेपल्या असताना अचानक एवढ्या मुलांच्या झुंडी येतात कुठून आणि ही मुले कोण, सगळेच प्रश्नांकित? काय तर शाळा आॅनलाइन घेतल्यात, तर परीक्षासुद्धा आॅनलाइनच पाहिजेत. मग या आॅफलाइन आणि आॅनलाइन परीक्षा म्हणजे काय हे मी पुण्याच्या दीक्षित अ‍ॅकॅडमीच्या दीक्षित सरांकडून समजून घेतले. आॅनलाइन परीक्षा यासुद्धा आॅफलाइन परीक्षेप्रमाणे सेंटरवर जाऊनच द्यायला लागतात. फक्त आॅनलाइनला आॅब्जेक्टिव्ह प्रश्न असतात. ज्यात ४ पर्यायांपैकी तुम्हाला एक योग्य पर्यायावर क्लिक करायचे असते. जे सुद्धा पटकन बरोबर करणे हेही स्किलच असते. तर आॅब्जेक्टिव्ह मध्ये १० मार्कांचा एक असे सुद्धा प्रश्न असतात, ज्यात तुमचे थेरी नॉलेज जरूर असते. मग जर दोन्हीतही हुशारी पाहिजेच तर परीक्षा व्हायलाच पाहिजेत, असा दीक्षित सरांचा आग्रह.
मग अशा प्रकारचे आंदोलन म्हणजे शैक्षणिक पद्धतीला धब्बा आहे. मग ही मुले कोणी उडाणटप्पू, टपोरी किंवा ज्यांना अभ्यासाचा काही गंधच नाही, काही मेहनत न करता ९०% मार्क्स मिळवून तरून जाणारी, कुणाच्या तरी सांगण्यावरून स्वत:चे नुकसान करून घेणारी मुले होती का? एकतर दोन वर्षांत कोरोनामुळे खूप नुकसान झाले. धंदे बसले, नोकºया गेल्या आणि त्यात हे असे. नुकसान होईल खºया हुशार मुलांचे कारण खरोखर हुशार, केपेबल मुलांच्या पंगतीतच अगदी उडानटप्पू, फुकटे, कुचकामी मुले काहीही न करता आरामात येऊन बसतात. हे सगळे शिक्षण व्यवस्थेचे आणि देश उद्ध्वस्त होण्याचे प्रकार आहेत. जर एका वेळेस लाखाच्या संख्येत मुलांची बसण्याची सोय नसेल, तर पहिल्यापासून तशी योजना करणे गरजेचे आहे. सगळ्याच बाबतीत योजना बद्धता जरूर आहे. कारण असे नको तसे नको ही मानसिकता बदललीच पाहिजे. नाहीतर पेपर फुटणे, गुंडगिरीने हवे ते साध्य करणे, परीक्षा व्यवस्था भ्रष्ट करणे, पैसे चारून नोकरी मिळवणे, दादागिरीने हवे ते आपले करणे या गोष्टी सरासर वाढीला लागतील. मग याला पर्याय काय. हेही तितकेच खरे आहे की सगळेच टेस्ट मॅचमध्ये सेंचुरी मारणारे सचिन तेंडुलकर नसतात. काही २०-२० मॅचमध्ये पण चमकून जातात. मग अशाप्रकारे शिक्षणाचा बळी का जाऊन द्यायचा. आज अमेरिकेसारख्या देशात आपली भारतीय मुले नोकरीत मोठमोठ्या हुद्यावर आहेत. त्यांना तिथे मागणी आहे, ती त्यांच्या हुशारी मुळेच. कदाचित आपल्या याच चुकीमुळे ७० ते ८०% भारतीय मुले अमेरिकेत नोकºया करून सेटल झाली आहेत. मग शिक्षण तज्ज्ञांनी यात लक्ष घालून काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

– वैशाली वसंत देसाई.\\

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …