आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : सेमीफायनलमध्ये जागा मिळवलेल्या भारताचा जपानविरुद्ध सामना

ढाका – सेमीफायनलमध्ये जागा निश्चित केल्यानंतर गतविजेता भारत रविवारी येथे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पुरुष हॉकी स्पर्धेतील आपल्या अखेरच्या राऊंड रॉबिन सामन्यात रविवारी जेव्हा जपानविरुद्ध खेळण्यास मैदानात उतरेल, तेव्हा त्यांचा प्रयत्न विजयाची क्रम कायम राखणे असेल. स्पर्धेतील मंद सुरुवातीनंतर ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या भारतने सलग दोन विजयांसह पाच संघांच्या स्पर्धेत लय प्राप्त केली. आलिम्पिकमधील ऐतिहासिक मोहिमेनंतर आपली पहिली स्पर्धा खेळणाऱ्या भारतीय संघाला सुरुवातीच्या सामन्यात कोरियाने २-२ असे बरोबरीत रोखले. भारताने त्यानंतर शानदार पुनरागमन केले व यजमान बांगलादेशचा ९-० असा पराभव करत शुक्रवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३-१ असे नेस्तनाभूत केले. भारत तीन सामन्यात सात गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्याच्यानंतर कोरिया (पाच) दुसऱ्या, जपान (दोन) तिसऱ्या व पाकिस्तान (एक) चौथ्या स्थानी आहे. स्पर्धेत जेतेपदाच्या दावेदारच्या रूपात आलेला भारतीय संघ आपली सध्याची लय व जागतिक क्रमवारीच्या आधारे इतर संघांपेक्षा खूप पुढे आहे. दरम्यान, कोरियाने सुरुवातीच्या सामन्यात त्यांची दोन गोलची आघाडी संपुष्टात आणत त्यांना बरोबरीवर रोखले. कोरियाविरुद्धचा सामना भारतीयांना एक इशारा देणारा होता. ते बांगलादेशविरुद्ध पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसले व सामन्यातील ६० मिनिटे त्यांनी आपला दबदबा दाखवला. शेजारील देश पाकिस्तानविरुद्ध अटीतटीचा सामना होण्याची शक्यता होती व अखेरच्या दोन क्वार्टरमध्ये असेच झाले. या सामन्यातील भारताच्या दबदब्याचा अंदाज या गोष्टीवरून लावू शकतो, जिथे पाकिस्तानला पहिल्या दोन क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नर मिळवणे लांबच तर गोलच्या जवळही भारतीय हॉकीपटूंनी येऊ दिले नाही. पण पाकिस्तानने अखेरच्या दोन क्वार्टरमध्ये पुनरागमन करत अखेरच्या १५ मिनिटांत चांगली कामगिरी केली. ललित उपाध्याय, आकाशदीप सिंग व दिलप्रीत सिंगने भारतीय फॉरवर्डच्या रूपात चांगली कामगिरी केली. तसेच मिडफिल्डमध्ये कर्णधार मनप्रीत सिंग व डिफेंसमध्ये उपकर्णधार हरमनप्रीत सिंगने चांगली बळकटी दिली. यासर्वांसोबत भारताचा युवा गोलकीपर सूरज करकेराने आपल्या कामगिरीने अनेकांना थक्क केले. त्याने खासकरून पाकिस्तानचे अनेक शानदार गोल वाचवले. सामन्याचा रेकॉर्ड पाहता जपानविरुद्ध भारताचे पारडे जड आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये दोन संघांत झालेल्या सामन्यात ५-३ ने विजय मिळवला होता. आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये रेकॉर्ड व क्रमवारी महत्त्वाची नसते, कारण मैदानातील एक वाईट दिवस संपूर्ण मेहनतीवर पाणी फेरू शकते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …