आशियाई चॅम्पियनस चषक : पाकिस्तानला नमवत भारताने कांस्य पटकावले

ढाका – ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा रोमहर्षक सामन्यात ४-३ असा पराभव करत आशियाई चॅम्पियन चषक पुरुष हॉकी स्पर्धेचे कांस्य पदक पटकावले. मस्कतमध्ये मागील वेळी झालेल्या स्पर्धेत भारत व पाकिस्तान संयुक्त विजेता होते. भारताचा मंगळवारी झालेल्या सेमीफायनलमध्ये जपानने ५-३ असा पराभव केला. भारताने पहिल्या मिनिटांत हरमनप्रीत सिंगच्या गोलने आघाडी मिळवली. त्यानंतर सुमित (४५ व्या मिनिटाला), वरुण कुमार (५३ व्या मिनिटाला) व आकाशदिप सिंग (५७ व्या मिनिटाला) ने गोल केला. पाकिस्तानसाठी अफराज (१० व्या), अब्दुल राणा (३३ व्या) व अहमद नदीम (५७ व्या)ने गोल केले. भारताचा या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सलग दुसरा विजय ठरला. त्याआधी राऊंड रॉबिन सत्रात भारताने पाकिस्तानला ३-१ असे नमवले होते. या स्पर्धेच्या फायनलमध्ये दक्षिण कोरिया व जपान आमने-सामने आहेत.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …