ठळक बातम्या

आलिया भट्ट ठरली पेटा २०२१ ची पर्सन आॅफ द इअर


आलिया भट्टने सन २०१२ मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करण जौहरचा

चित्रपट स्टुडंट आॅफ द इअरने केली होती. आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकून घेणाºया आलियाने आपल्या १० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक यशस्वी चित्रपट केले व आजच्या घडीला ती बॉलीवूडमधील सर्वाधिक फी घेणाºया अभिनेत्रींच्या यादीत दाखल झाली आहे. एका प्रतिभावान अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख प्रस्थापित करणारी आलिया सामाजिक कार्यातही तितक्याच हिरीरिने भाग घेताना दिसते. ती आपल्या सोशल मीडियाद्वारे नेहमी चाहत्यांना प्राण्यांवर प्रेम करण्यासाठी प्रेरित करताना दिसते.
आता आलियाला प्राण्यांसाठी अनुकूल अशा फॅशन उद्योगाच्या समर्थनार्थ काम करण्यासाठी पिपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट आॅफ एनिमल्स (पेटा)च्या २०२१ पर्सन आॅफ द इअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आलियाने अलीकडेच एका कंपनीत गुंतवणूक केली होती. ही कंपनी मंदिरात टाकण्यात येणाºया फुलांपासून शाकाहारी चामडे बनवते. याशिवाय पेटाने आलियाला २०२१ इंडिया फॅशन पुरस्कारानेही गौरविले आहे.

आता जर आलियाचे प्राण्यांवर इतके प्रेम आहे हे तर सोशल मीडियावरून स्पष्ट होतेच. त्याचबरोबर ती कुत्रा आणि मांजर यांची वकिली करण्यासाठीही ओळखली जाते. तिने आजवर अनेकदा पशू संरक्षण कायद्यासाठी आवाज उठवला आहे. आलियाने पेटाच्या भारतीय मोहिमेशी कनेक्ट होतही काम केले आहे.
पेटा इंडियाचे सेलिब्रेटी आणि जनसंपर्क संचालक, सचिन बंगेरा यांनी सांगितले की, आलिया भट्ट ही केवळ शाकाहारी फॅशनला प्रोत्साहित करण्याचेच काम करत नाही, तर त्याचबरोबर ती कुत्रा आणि मांजर यांना दत्तक घेण्यासाठी चाहत्यांना प्रेरित करण्याचे कामही करत असते.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …