आर.बाल्की यांनी आटोपले सायकोलॉजिकल चूपचे शूटिंग

आर.बाल्की यांचा बहुप्रतिक्षित सायकोलॉजिकल थ्रिलर विषयी चाहते खूपच उत्साहित आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आर.बाल्की यांनी आपला चित्रपट चूपचे शूटिंग आटोपले आहे. चित्रपटाचे शूटिंग संपल्याची माहिती अभिनेत्री श्रेया धन्वंतरीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करून दिली आहे.

या फोटोत ती विशाल सिन्हा, चित्रपट दिग्दर्शक आणि क्रू मेंबर्ससोबत आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहे. त्याचबरोबर फोटोज, व्हिडीओमध्ये शूटिंग आटोपल्यानंतर टीम मेंबर्सला केक खायला घालतानाही पाहायला मिळत आहे. बॉलीवूड लेजंड चित्रपट निर्माते गुरुदत्त यांच्या पुण्यतिथी दिनी आर.बाल्की यांनी आपल्या या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या नावाचा खुलासा केला होता. या चित्रपटाद्वारे अभिनेता सनी देओल अभिनय जगतात कमबॅक करत आहे. सनी देओल व्यतिरिक्त या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार सलमान, अभिनेत्री श्रेया धन्वंतरी आणि पूजा भट्ट लीड रोल्समध्ये दिसून येणार आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …