ठळक बातम्या

आर्यन खानला मोठा धक्का; न्यायालयाबरोबर तुरुंगामधील अडचणीही वाढल्या, आता आर्थर रोड तुरुंगात…

क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या अटकेत असून आर्थर रोड जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं आहे. आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी वकिलांकडून पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान आर्थर रोडमध्ये क्वारंटाइन बराकमध्ये असलेल्या आर्यन खानसमोर आता नवं आव्हान आहे. कारण क्वारंटाइनचा कालावधी संपला असल्याने आर्यन खानला इतर कैद्यांसोबत राहावं लागणार आहे.

करोनामुळे नव्या कैद्यांना जेलमध्ये आणल्यानंतर इतर कैद्यांसोबत ठेवलं जात नाही आहे. त्यांना इतर कैद्यांपासून वेगळं क्वारंटाइन बराकमध्ये ठेवलं जातं. त्यानुसार आर्यन खानसह इतरांनाही तिथे ठेवण्यात आलं होतं. दरम्यान आर्यन खानचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. यामुळे त्याला आता क्वारंटाइन बराकमधून इतर कैद्यांसोबत ठेवण्यात आलं आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *