आर्चरच्या हातावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया

 

लंडन – इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्ड (इसीबी) म्हणाले की, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने आपल्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करवून घेतली व तो पुढील उन्हाळ्याच्या मौसमापर्यंत क्रिकेटपासून लांब राहील. इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाची कमतरता सध्या सुरू असलेल्या ॲशेस मालिकेतही जाणवत आहे. त्याच्यावर ११ डिसेंबरला लंडनमध्ये शस्त्रक्रिया पार पडली. इसीबीने दिलेल्या माहितीनुसार, ही शस्त्रक्रिया त्याच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर झाली. हा हात त्याचा अनेक दिवसांपासून दुखत होता. हा २६ वर्षीय वेगवान गोलंदाज मागील ९ महिन्यांपासून अव्वल पातळीवरील क्रिकेट खेळला नाही. तो मार्चमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेतही खेळू शकणार नाही. आर्चरवर पहिल्यांदा मेमध्ये आयपीएलमधून हटल्यानंतर शस्त्रक्रिया पार पडलेली. इंग्लिश काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये ससेक्ससाठी गोलंदाजी करताना त्याच्या या दुखण्याने पुन्हा डोके वर काढले.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …