पुणे – आरोग्य भरती पेपरफुटीप्रकरणी अजून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. लातूर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेने ज्या विद्यार्थ्यांना पेपर दिले होते, त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये नामदेव सिद्राम कारंडे (३१, बीड), उमेश वसंत मोहिते (२४, उमरगा, उस्मानाबाद) या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाचा पेपर आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच इतरांच्या मदतीने फोडल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. बडगिरेने ज्या विद्यार्थ्यांना पैसे घेऊन पेपर दिले होते, त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पेपरफुटीप्रकरणी राज्यातून अटक केलेल्यांची संख्या आता १४ वर गेली आहे. बीड जिल्हा आरोग्य विभागात कामाला असणाऱ्या एका महिलेचा नामदेव हा नातेवाईक आहे. आरोग्य विभागाच्या गट ड चा पेपर फुटला. त्याप्रमाणेच गट क चा पेपर फुटला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी सायबर पोलीस ठाण्यात काही परीक्षार्थींनी क गट पेपरफुटी बाबत तक्रार दिली. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला असून, ते पडताळून तपास करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी सांगितले. महेश बोटले या गट क व गट ड या पदाच्या भरतीच्या लेखी परीक्षेचा पेपर समितीचा सदस्य आहे. त्याने गट ड शिवाय इतर गटांच्या भरती परीक्षेमध्ये आणखी कोणत्या एजंटांना त्या परीक्षेचे पेपर्स वितरीत केले आहे, याचा तपास आता करण्यात येणार आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …