आयुष्यातील एक वाईट टप्पा पाहिल्यानंतर आता वार्षिक १ कोटी रुपये कमावते ही महिला

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात चांगले आणि वाईट काळ येतात. स्वत:ला बळकट करून पुढे जाणे हीच मोठी गोष्ट आहे. ब्रिटनमधील ३ मुलांची आई असलेली एली बर्स्काफने आयुष्यातील वाईट टप्पा पाहिल्यानंतर आता वर्षाला १ कोटी रुपये कमावते आहे.
युनायटेड किंगडममधील लँकेशायर येथील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय एलीला २०१० पासून वाईट काळाचा सामना करावा लागला, जेव्हा तिने आपल्या मोठ्या मुलीला जन्म दिला. आॅस्ट्रेलियातील क्विन्सलँडमध्ये राहत असताना त्यांना अनेक महिने बेनिफिट चेकवर आयुष्य घालवावे लागले. बेलआऊटमध्ये मिळालेल्या पैशातून ती आपल्या मुलांचे संगोपनही करत होती, परंतु नंतर तिने कठोर संघर्षातून स्वत:ला स्थापित केले.

एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, एलीने तिच्या पहिल्या मुलीला जन्म देण्यापूर्वी ती एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. तिचा साथीदार पोर्तुगीज असल्यामुळे तो आॅस्ट्रेलियात येऊन काम करू शकला नाही, पण त्याच्याकडे ब्रिटन आणि आॅस्ट्रेलियाचा वर्क व्हिसा होता. जेव्हा त्यांच्या मुलीचा जन्म झाला तेव्हा त्यांनी नोकरी सोडली होती. मूल ६ महिन्यांचे असताना सरकारच्या अन्न आणि कल्याणकारी योजनांतून मिळालेल्या पैशातून एलीचे आयुष्य चालत होते. त्यांच्या खात्यात एक पैसाही नव्हता. त्यांची परिस्थिती फारच दयनीय व वाईट होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …