ठळक बातम्या

आयसीसी संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान नाही

  • नेतृत्व पाकिस्तानच्या बाबर आझमच्या हाती

दुबई – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. आर्श्चयाची बाब म्हणजे आयसीसीने निवडलेल्या संघात एकाही भारतीय गोलंदाज किंवा फलंदाजाचा समावेश करण्यात आलेला नाही. आयसीसीने या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडे सोपवली आहे. या संघात डेव्हिड वॉर्नर आणि जोस बटलर यांची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. या दोन्ही खेळाडूंची कामगिरी संपूर्ण टी-२० स्पर्धेत उत्कृष्ट राहिली. या स्पर्धेत बटलरचे एकमेव शतक आहे. या संघातील मधल्या फळीतील फलंदाजांवर नजर टाकली तर इथेही एकापेक्षा एक नावे आहेत. यामध्ये बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा चारिथ अस्लंका, पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम आणि सहाव्या क्रमांकावर इंग्लंडचा मोईन अली आहे. या आयसीसी संघात आशिया खंडातील केवळ ४ जणांना स्थान मिळाले आहे.
फलंदाजीनंतर गोलंदाजीचा विचार केला तर संघात दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. आयसीसीने फिरकीपटूंमध्ये श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगा आणि ॲडम झम्पा यांची निवड केली आहे, तर जोस हेझलवूड, ट्रेंट बोल्ट आणि ॲनरिक नॉटर्जे हे वेगवान गोलंदाज आहेत. आयसीसीने या संघाचा १२ वा खेळाडू म्हणून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची निवड केली आहे. संपूर्ण स्पर्धेत शाहीनची कामगिरी उत्कृष्ट होती.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप प्लेइंग इलेव्हन
डेव्हिड वॉर्नर – ४८.१६ च्या सरासरीने २८९ धावा

जोस बटलर – ८९.६६ च्या सरासरीने २६९ धावा
बाबर आजम – ६०.६० च्या सरासरीने ३०३ धावा

चरिथ असलंका – ४६.२० च्या सरासरीने २३१ धावा
एडम मार्कराम – ५४ च्या सरासरीने १६२ धावा

मोईन अली – ९२ धावा आणि ७ विकेट्स
वनिंदू हसरंगा – ११९ धावा व १६ विकेट्स

ॲडम झम्पा – १३ विकेट्स
जोश हेझलवूड – ११ विकेट्स

ट्रेंट बोल्ट – १३ विकेट्स
ॲनरीच नॉर्ट्जे – ९ विकेट्स

शाहिन आफ्रिदी ( १२ वा खेळाडू ) – ७ विकेट्स.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …