आयसीसी कसोटी क्रमवारी: रोहित, कोहली, अश्विनचेस्थान कायम

* बुमराह एक स्थान घसरला

दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी कसोटीतील ताजी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत काही मोठे फेरबदल झाले आहेत. आयसीसी कसोटी क्रमवारी भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली फलंदाजीत तर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने गोलंदाजीमध्ये आपआपले स्थान कायम ठेवले आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या क्रिकेटपटुंच्या क्रमवारीत फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याला पहिल्या कसोटीतील खराब कामगिरीचा फटका बसला. तो दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. केनच्या खराब कामगिरीचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला झाला. तो ८९१ गुणांसह दुसऱ्या स्थानवर आहे, तर इंग्लंडचा जो रुट पहिल्या स्थानावर आहे. रोहित ८०५ गुणांसह पाचव्या तर विराट ७७५ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह एक स्थान घसरून १० व्या स्थानावर आहे.
कानपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटीचा भारतच्या इतर खेळाडूंनाही फायदा झाला आहे. असे असले तरी रोहित, कोहली आणि जसप्रीत बुमराह या कसोटीत खेळले नव्हते. पहिली कसोटी खेळताना सामनावीर ठरलेल्या श्रेयस अय्यरने फलंदाजीत १०५ आणि ६५ धावा केल्या. यामुळे फलंदाजी क्रमवारीत त्याला ७५वे स्थान मिळाले आहे. शुभमन गिल सहा स्थानांनी चढून ६६व्या स्थानावर आला आहे. रिद्धीमान साहा नऊ स्थानांनी ९९ व्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारत्नेला क्रमवारीत चार क्रमांकाचा फायदा झाला आहे. तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे. या कसोटीत न्यूझीलंडसाठी, टॉम लॅथमने ९५ आणि ५२ धावा केल्या. यामुळे तो १४ वरून नवव्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशसाठी मुशफिकुर रहीम चार स्थानांनी पुढे येऊन १९ व्या स्थानावर आहे. आबिद अलीचे दुसऱ्या डावात शतक हुकले असले तरी १३३ आणि ९१ धावांच्या खेळीमुळे तो २० व्या क्रमांकावर आहे. त्याला २० स्थानांचा फायदा झाला. लिटन दास ३१ व्या स्थानावर पोहचला आहे. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ९०८ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. रवींद्र जडेजा दोन स्थानांनी पुढे १९ व्या स्थानावर पोहोचला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही मात्र तो दुसऱ्या स्थानावर आहे. काइल जेमिसन नवव्या क्रमांकावर आहे. टीम साऊदी तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी पाचव्या स्थानावर आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …