आयसीसीचे ‘ त्या’ गोष्टीच्या चौकशीचे आदेश

दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (आयसीसी)ने अमिरात क्रिकेट बोर्डा (ईसीबी)ला अफगाणिस्तान व पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषक सुपर-१२ सामन्यादरम्यान दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या बाहेर तिकिटांशिवाय घुसलेल्या अफगाण समर्थकांच्या बेशिस्तपणाच्या तपासाचे आदेश दिलेत.

पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यातील शुक्रवारी झालेल्या या सामन्यात १६००० तिकीट जारी केले, पण हजारोच्या संख्येत येथे तिकिटांशिवाय येथे चाहते पोहचले व स्टेडियमच्या आत घुसण्याचा प्रयत्न करू लागले. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, दुबई पोलीस व सुरक्षा स्टाफने अतिरिक्त दल तैनात केले व परिस्थिती सांभाळली. जवळपास ७ वाजता दुबई पोलिसांनी सर्व दरवाजे बंद केले व कोणालाही प्रवेश न देण्याचे आदेश दिले, जेणेकरून स्टेडियमच्या आतील परिस्थिती नियंत्रणात राहील. आयसीसी म्हणाली की, भविष्यात अशाप्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उपाय-योजना आखल्या जातील. त्यात पुढे सांगण्यात आले, आयसीसी, बीसीसीआय व ईसीबी त्या चाहत्यांची माफी मागते, जे तिकीट असतानाही स्टेडियममध्ये जाऊ शकले नाहीत. त्यांना विनंती आहे की, त्यांनी तिकिटाचे पैसे घेण्यासाठी संबंधित संस्थेशी संपर्क साधावा.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …