आयसीसीचा इंग्लंडला अजून एक धक्का

BRISBANE, AUSTRALIA – DECEMBER 11: Joe Root of England walks off the field with team mates after losing during day four of the First Test Match in the Ashes series between Australia and England at The Gabba on December 11, 2021 in Brisbane, Australia. (Photo by Chris Hyde/Getty Images)
  •  ठोठावला आठ गुणांचा दंड

दुबई – ॲशेस मालिकेत जो रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ आधीच ०-१ ने पिछाडीवर आहे. दुसऱ्या कसोटीतही त्यांची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. दरम्यान, आयसीसीने जो रूटच्या संघाला दोन मोठे झटके दिलेत. आयसीसीने इंग्लंडला पाच नव्हे, तर आठ गुणांचा दंड ठोठावला आहे. खरे तर ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी इंग्लंडला विश्व कसोटी चॅम्पियनशीपच्या (डब्ल्यूटीसी) पाच नव्हे, तर आता आठ गुणांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता.
आयसीसीने यापूर्वी जाहीर केले होते, की इंग्लंड संघाला त्यांच्या मॅच फीच्या १०० टक्के दंड आणि पाच विश्व कसोटी चॅम्पियनशीप गुण वजा केले जातील. इंग्लंडने नियोजित वेळेपेक्षा आठ षटके कमी टाकली होती (आधी जाहीर केल्याप्रमाणे पाच षटके नव्हती.) यामुळे तीन अतिरिक्त गुण वजा करण्यात आले. आयसीसीने सांगितले, लहान षटकांच्या संख्येनुसार प्रतिषटक एक गुण दंड आकारण्यात आला. इंग्लंड संघ आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळला असून त्यांचे सहा गुण झाले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …