ठळक बातम्या

आयर्लंडची क्रिकेटपटू गॅबीच्या ट्विटने वेधले सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली – ओमिक्रॉन या कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकारामुळे महिला वर्ल्ड कप २०२२ ची क्­वालिफायर फेरी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आयर्लंड संघ मायदेशी परतला आहे, परंतु क्रिकेटपटूंचे सामान अद्याप आयर्लंडला पोहोचलेले नाही. आयर्लंडची महिला क्रिकेटपटू गॅबी लेविसने आपल्या सामानांची अपडेट मागितली आहे. आपले सामान ओमानमध्येच राहिले असल्याची माहिती तिने ट्विट करीत दिली आहे. इतकेच नव्हे, तर रडतानाचे इमोजीही तिने ट्विटमध्ये पोस्ट केले आहेत. त्यामुळे, तिच्या या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने आपल्या अधिकृ त ट्विटर अकाऊंटद्वारे ट्विट करीत आयसीसीकडे आपल्या सामानासंदर्भात काही अपडेट्स आहेत की नाही? याची विचारपूस केली आहे.
‘ओमानमध्ये माझे सामान राहिले आहे. या गोष्टीला १३ दिवस उलटून गेले आहेत. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, त्या सामानामध्ये माझ्या कॉलेजच्या नोट्ससुद्धा होत्या’ असे लिहित तिने पुढे रडतानाचे इमोजीही जोडले आहेत. तिची ही चिंताग्रस्त मागणी पाहून क्रिकेट चाहत्यांचे गॅबीने लक्ष वेधले आहे. अनेकांनी तिच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत, आयसीसीकडे लवकरात लवकर तिचे सामान शोधण्याची मागणी केली आहे.
२० वर्षीय गॅबीने आयर्लंडकडून २२ एकदिवसीय आणि ४८ टी-२० सामने खेळले आहेत. तिने ५०५ वनडे आणि १००० टी-२० धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्येही तिच्या नावावर शतक आहे. याशिवाय तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० आणि टी-२० क्रिकेटमध्ये ३ विकेट्स घेतल्या आहेत. गॅबी ही आयर्लंड महिला क्रिकेट संघासोबत ओमानच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी चुकून ती तेथील विमानात तिचे सामना विसरली आहे. त्या सामानामध्ये तिच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टीही होत्या. या गोष्टीला जवळपास १३ दिवस उलटले आहेत, परंतु अद्याप तिच्या सामानासंदर्भात कसलीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या गॅबीने थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल अर्थात आयसीसीकडे मदतीसाठी धाव घेतली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …