आयपीएल-२०२२ : लिलावाची तारीख ठरली १२-१३ फेब्रुवारीला बंगळुरूत जमणार संघमालक

बंगळुरू – आयपीएल-२०२२ च्या महालिलावाची तारीख जाहीर झाली आहे. दोन दिवस ही लिलाव प्रक्रिया चालणार आहे. १२ आणि १३ फेब्रुवारीला हा लिलाव होईल. बंगळुरूमध्ये हा लिलाव आयोजित केला जाणार आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा लिलाव असेल. या महालिलावासाठी खेळाडूंची यादी जानेवारीपर्यंत निश्चित केली जाईल. आयपीएल-२०२२ मध्ये लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ दाखल झाले आहेत. या संघांना जास्तीत-जास्त तीन खेळाडू रिटेन करण्याचा अधिकार मिळाला आहे. महालिलावाआधी हे रिटेन्शन होणार आहे.
नव्या संघांसाठी रिटेन्शनची तारीख २५ डिसेंबर होती, पण आता ही मर्यादा वाढवण्यात येणार आहे. अजूनपर्यंत अहमदाबाद फ्रँचायजीचे लेटर ऑफ इटेंट सीव्हीसी कॅपिटलला मिळालेले नाही. सीव्हीसी कॅपिटल बेटिंग कंपनीसोबतच्या लिंकच्या चर्चेमुळे वादात सापडली होती. त्यामुळे बीसीसीआयला कायदेशीर सल्ला घ्यावा लागला होता. बीसीसीआय अधिकृ तरित्या लवकरच सीव्हीसी कॅपिटलला अहमदाबाद संघाचा मालकी हक्क देईल. लखनऊ या दुसऱ्या नव्या फ्रँचाजयीबाबत कुठलाही वाद नाही. त्यांनी आपले मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर, सहाय्यक कोच विजय दहिया आणि मार्गदर्शक गौतम गंभीर निश्चित केले आहेत. केएल राहुल लखनऊ संघाकडून खेळेल अशी चर्चा आहे.
आयपीएलमध्ये आधीपासून असलेल्या ८ संघांनी ३० नोव्हेंबरला रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे दिली होती. लिलावाच्या आधी सर्व संघांना ९० कोटी रुपयांचे पर्स दिल्या गेल्या आहेत. खेळाडूंना रिटेन केल्यानंतर पर्समधून पैसे वजा होतात. त्यानंतर पर्समध्ये उरलेल्या रकमेतूनच महालिलावामध्ये खेळाडूंवर बोली लावली जाते. यावर्षी आयपीएलमध्ये १० संघ असतील. संजीव गोएंका यांच्या मालकीचा लखनऊ फ्रँचायजी तसेच व्हेंचर कॅपिटलचा अहमदाबाद संघ आयपीएलमध्ये नव्याने पदार्पण करणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …