आयपीएल : सनरायझर्स हैदराबादला चॅम्पियन करण्यासाठी दिग्गज खेळाडू टीममध्ये परतणार!

मुंबई/हैदराबाद – आयपीएल विजेत्या सनरायझर्स हैदराबादसाठी मागील सीझन चांगलाच निराशाजनक ठरला. त्यांना १४ पैकी फक्त ३ सामने जिंकता आले होते. स्पर्धा सुरू असताना डेव्हिड वॉर्नरला क र्णधार पदावरून काढण्याचा सनरायझर्स हैदराबादचा निर्णय देखील चांगलाच वादग्रस्त ठरला. कर्णधार बदलल्यानंतरही सनरायझर्स हैदराबादला शेवटचा क्रमांक टाळता आला नाही. आता हैदराबादच्या टीमने २०१६ प्रमाणे पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याची तयारी सुरू केली आहे.
सनरायझर्स हैदराबाद पुढील सीझनसाठी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जलदगती गोलंदाज डेल स्टेनला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कराबद्ध करणार आहे. स्टेन आणि हैदराबाद यांच्यातील बोलणी आता अंतिम टप्प्यात आली आहेत. शेवटच्या क्षणी ही बोलणी काही कारणांमुळे फिसकटली नाही, तर पुढील आठवड्यात याबाबतची अधिकृ त घोषणा करण्यात येईल. स्टेनने यावर्षीच ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने आयपीएल स्पर्धेत एकूण ९५ सामने खेळले आहेत. सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात लायन्स या टीम्सचे स्टेनने प्रतिनिधीत्व केले आहे. टॉम मूडी हे सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक असून तो त्यांच्यासोबत पुढील सीझनमध्ये काम करणार आहे. या प्रकरणात काहीही बोलण्यास स्टेनने नकार दिला आहे.
डेल स्टेनने त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये ९३ कसोटी सामन्यांमध्ये ४३९ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर १२५ वन-डेमध्ये १९६ आणि ४७ टी-२० इंटरनॅशनलमध्ये ६४ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. तो आयपीएल २०२० मध्ये आरसीबीकडून खेळला होता. टीम इंडियाचा माजी बॅटसमन हेमांग बदानी देखील हैदराबाद टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये दाखल होणार आहे. हैदराबादचा मेंटर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक बनला आहे, तर माजी हेड कोच ट्रेवर बेलिस आणि बॅटींग कोच ब्रॅड हॅडीन यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हैदराबादच्या कोचिंग स्टाफमध्येही सध्या जागा आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …