मुंबई/मेलबर्न – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील अॅशेस सीरिजमधील दुसऱ्या कसोटीला गुरुवारी सुरुवात होत आहे. अॅडलेडमध्ये होणारी ही कसोटी दिवस-रात्र असणार आहे. या मालिकेमधील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सनी जिंकली होती. आता दुसरी कसोटीही जिंकून मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी मिळवण्याचा यजमान टीमचा प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलियाने या कसोटीची प्लेईंग ११ जाहीर केली असून, त्यामध्ये एक बदल केला आहे. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड जखमी झाला होता. हेझलवूडच्या जागी झाय रिचर्डसनचा प्लेईंग ११ मध्ये समावेश केला असल्याची घोषणा ऑस्ट्रेलियाचा क र्णधार पॅट कमिन्सने केली आहे. रिचर्डसनला आयपीएल २०२१ च्या लिलावात पंजाब किंग्जने १४ कोटींना खरेदी केले होते. मात्र खराब कामगिरीमुळे त्याला रिटेन करण्यात आले नाही.
झाय रिचर्डसनने आजवर १३ एकदिवसीय सामने खेळले असून त्यामध्ये २४ विकेट्स घेतल्या आहेत, तर १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २०१९ साली श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने आजवर दोन कसोट्यांमध्ये ६ विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियन टीमसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे डेव्हिड वॉर्नर फिट असून तो दुसऱ्या टेस्टमध्ये खेळणार आहे. वॉर्नरला ब्रिस्बेन कसोटीदरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तो दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंग आणि बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरला नव्हता. अॅडलेड कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन टीममध्ये डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरीस, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि झाय रिचर्डसन यांचा समावेश असणार आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …