आयपीएल मेगा लिलाव ७ व ८ फेब्रुवारीला बंगळुरूत

नवी दिल्ली – बीसीसीआयने आयपीएलच्या मेगा लिलावाचे आयोजन ७ व ८ फेब्रुवारीला बंगळुरूत आयोजित केले आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी याची माहिती दिली. हा आयपीएलचा अखेरचा मेगा लिलाव असू शकतो, कारण बहुतेक आयपीएल संघ आता हा लिलाव बंद करू इच्छितो. बोर्डाचे एक अधिकारी म्हणाले की, कोरोना महामारीमुळे स्थिती खराब न झाल्याने आयपीएलचा मेगा लिलाव भारतातच होईल. दोन दिवसीय लिलाव ७ व ८ फेब्रुवारीला बंगळुरूत होईल. त्याची तयारी सुरू आहे. अशा चर्चा होत्या की, लिलाव युएईमध्ये होईल, पण बीसीसीआयने सध्या अशी कोणतीच योजना आखलेली नाही. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढण्याच्या दिशेने परदेश प्रवासावरील निर्बंध वाढू शकतो, ज्यामुळे ही स्पर्धा भारतात करणे सोपे होईल. यावेळी आयपीएलमध्ये १० संघ होती, कारण लखनऊ व अहमदाबाद हे नवे संघ जोडलेत. दोन्ही संघाकडे ड्राफ्टमध्ये निवडलेल्या तीन खेळाडूंची घोषणा करण्यासाठी नाताळपर्यंतची वेळ आहे. बीसीसीआय त्यांना जास्त वेळ देऊ शकते, कारण सीव्हीसीला अद्याप मान्यता मिळालेली नाही. बहुतेक संघाचे मत आहे की, प्रत्येक तीन वर्षांत लिलाव झाल्यास संघाचे नियोजन बिघडते. दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदल म्हणाले की, संघ बनवण्यासाठी एवढी मेहनत केल्यानंतर खेळाडूंना सोडणे खूप कठीण काम असते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …