ठळक बातम्या

आयपीएल टीम खरेदी करण्यास रणवीर-दीपिका उत्सुक

मुंबई – अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण ही जोडी आगामी आयपीएलमध्ये एक नवा संघ खरेदी करणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या आयपीएलमध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आगामी आयपीएलमध्ये ८ ऐवजी एकूण १० संघांचा समावेश केला जाणार आहे. याचाच अर्थ येत्या आयपीएलमध्ये दोन नवे आयपीएल संघ असणार आहेत. हे संघ नेमके कोणते असतील? त्यांची नावे काय? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र हे दोन संघ खरेदी करण्यासाठी लिलाव आयोजित केला जाणार असून यात अनेक मोठमोठे कलाकार सहभागी होण्याची शक्यता आहे. अनेक कलाकार, व्यावसायिक हे क्रिकेट टीम खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. यात रणवीर आणि दीपिकाचेही नाव समोर येत आहे. त्यांनी नुकतेच यासंदर्भात अर्ज दाखल केला आहे. या दोघांच्या टीमबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, २ नव्या आयपीएल टीमसोबत यंदा खेळाडूंचा लिलावही पुन्हा केला जाणार आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूवर आगामी आयपीएलमध्ये पुन्हा बोली लावली जाणार आहे. त्यामुळे जर रणवीर-दीपिका या जोडीने क्रिकेटचा संघ खरेदी केला तर ते जुही चावला, शाहरूख खान, प्रिती झिंटा यांच्या यादीत सहभागी होतील. यामुळे रणवीर आणि दीपिका आयपीएलमध्ये एक संघ खरेदी करतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …