मुंबई- माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत प्रशिक्षणासह १६ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क मुंबई-ठाणे विभागीय आयडियल बुध्दिबळ स्पर्धेत श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूलच्या आर्या गोरडेने अपराजित राहून चेंबूर-गोवंडी विभागीय प्रथम क्रमांक पटकाविला. आर्यानेसर्वाधिक साखळी ४ गुणांची नोंद केली. शिवनेर व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्पोर्ट्स असोसिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेन सहकार्याने झालेल्या पहिल्या विभागीय स्पर्धेमधील पहिले तीन क्रमांक विजेते खेळाडू अंतिम लीगसाठी पात्र ठरले आहेत.
अपराजित आर्या गोरडेने अश्विनी सणसवर विजय मिळवून प्रथम स्थानाला गवसणी घातली. निर्णायक साखळी फेरीमध्ये रोहित भोईरने पार्थ पांचाळवर विजय मिळवून साखळी ३ गुणांसह सरस सरासरीच्या बळावर द्वितीय क्रमांकावर झेप घेतली. भागेश वैतीने संकल्प घाडीगावकरचा पराभव करून साखळी ३ गुणांसह तृतीय क्रमांकावर समाधान मानले. संयोजक नरेंद्र वाबळे व लीलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय खेळाडूंना मोफत बुध्दिबळ प्रशिक्षणासह विविध विभागात २३ डिसेंबरपर्यंत विनाशुल्क स्पर्धांचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय बुध्दिबळ खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद लाभत असून प्रत्येक विभागातील पहिल्या तीन क्रमांकाची अंतिम लीग २५ डिसेंबर रोजी होणार आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …