ठळक बातम्या

आयडियल बुध्दिबळ: आर्या गोरडे आघाडीवर

मुंबई – माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत प्रशिक्षणासह १६ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क मुंबई-ठाणे विभागीय आयडियल बुध्दिबळ स्पर्धेस मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या शुभेच्छेसह प्रारंभ झाला आहे. शिवनेर व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्पोर्ट्स असोसिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेन सहकार्याने चेंबूर-गोवंडी येथील पहिल्या विभागीय मोफत शालेय बुध्दिबळ स्पर्धेत आर्या गोरडेने साखळी ३ गुणांसह प्रथम स्थानाची आघाडी घेतली. तिसऱ्या चुरशीच्या साखळी सामन्यात गोवंडीच्या श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूलच्या आर्या गोरडेने (३ गुण) रोहित भोईरची (२ गुण) विजयीदौड रोखत प्रथम क्रमांकाच्या आघाडीवर झेप घेतली. भागेश वैतीला (२ गुण) शह देत अश्विनी सणसने (१ गुण) सनसनाटी विजय मिळविला. पार्थ पांचाळने नमन गुप्तावर तर प्रथमेश कारंडेने संकल्प घाडीगावकरवर मात करून साखळी गुणांचे खाते उघडले. क्रीडा प्रशिक्षक अविनाश महाडिक, प्रशिक्षक मंगेश भाटकर, क्रीडा शिक्षिका माधवी कदम व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन अखिल भारतीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन संयोजकांनी केले होते. यंदा शालेय स्तरावरील स्पर्धा प्रत्यक्षात होण्यासाठी संयोजक नरेंद्र वाबळे व लीलाधर चव्हाण यांच्याकडे सातत्याने मागणी झाल्यामुळे कोरोनाचे नियम गांभीर्याने पाळणाऱ्या शालेय खेळाडूंच्या सहभागाने स्पर्धेस सुरुवात करण्यात आली आहे. रविवारी दादर विभागीय तर मंगळवारी भायखळा विभागीय शालेय बुध्दिबळ स्पर्धा होतील. प्रत्येक विभागातून निवड झालेल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या सर्व खेळाडूंची निर्णायक साखळी फेरी २५ डिसेंबर रोजी होणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …