आयडियल बुद्धिबळ : अंतिम साखळी सामने ३१ डिसेंबर रोजी

मुंबई – शिवनेर व आयडियल स्पोर्ट्स ॲकॅडमीतर्फे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत प्रशिक्षणासह १६ वर्षांखालील शालेय मुला-मुलींची विनाशुल्क बुद्धिबळ स्पर्धेचे अंतिम सामने २५ डिसेंबर ऐवजी ३१ डिसेंबर रोजी परेल येथील आरएमएमएस वातानुकूलीन सभागृहात होणार आहेत. कोरोना प्रादुर्भावात सध्या अचानक वाढ होत असल्याची चिंता पालक वर्गाने व्यक्त केल्यामुळे तसेच संचारबंदीसह शासकीय निर्बधांचे पालन होण्यासाठी संयोजकांनी पूर्वनियोजित अंतिम स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंनी अभ्यासासोबत बुद्धिबळाचा सराव नियमित करण्याचे आवाहन संघटन समितीचे प्रमुख मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी केले आहे. विजेत्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, तसेच स्पर्धात्मक खेळाचा सराव मोफत लाभणार असल्यामुळे स्पर्धकांमध्ये चुरस आहे. अंतिम फेरीतील स्पर्धकांनी घरी सराव घेताना तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक अल्वारीस नेव्हिल यांच्या मार्गदर्शनाचा फोनवर लाभ घेऊन शंका समाधान करावे, असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …