आयटी रिटर्नडेडलाईन १५ मार्चपर्यंत वाढवली

नवी दिल्ली – केंद्र सरकारने इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची तारीख वाढवली आहे. आधी ही तारीख ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत होती. त्यामुळे आता 15 मार्चपर्यंत करदाते आपला रिटर्न फाईल करु शकतील. ३१ डिसेंबरनंतर असं मानलं जात होतं की सरकारकडून आयटी रिटर्न फाईल करण्याची तारीख वाढवली आहे. कारण कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक लोक आयटी रिर्टन फाईल करु शकले नव्हते. आता सरकारनेअशा लोकांना मोठा दिलासा दिला आहे.
आर्थिक वर्ष २०२०-२०२१ चे टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख १५ मार्च२०२२ करण्यात आली आहे. आता पुढील तीन महिन्यात करदातेआयकर परतावा भरु शकतील. आयटी रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतरही रिटर्न फाईल करण्याची संधी दिली जाते. त्याला बिलेटेड आयटीआर म्हणतात. त्याचे काही खास नियम आहेत. तसंच त्यात दंडाची आकारणीही होते. त्यामुळे आता करदाते कुठलाही दंड न भरता १५ मार्चपर्यंत आयकर परतावा भरु शकणार आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …