ठळक बातम्या

आयटीबीपीच्या २६ जवानांना अन्नातून विषबाधा

 

रायपूर : छत्तीसगडच्या राजनांदगांव जिल्ह्यातील भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या(आयटीबीपी) शिबिरात जेवणानंतर २६ जवानांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. त्यांना उपचारासाठी खैरागडच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जवानांवर योग्य उपचार करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाला निर्देश दिले. नक्षलविरोधी अभियान राबवल्यानंतर बुधवारी सायंकाळी आयटीबीपीच्या ४० व्या बटालियनचे जवान शिबीरात दाखल झाले होते. या सर्वांनी जेवणात पनीर व मांसाहार घेतला. जेवणानंतर काही तासांनी त्यांना उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. उपचारातनंतर सर्व जवानांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हाधिकारी तारण प्रकाश सिन्हा यांनी दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *