बहुचर्चित ‘पुष्पा : द राईज’मध्ये सामंथा रुथप्रभुचे पहिले आयटम नंबर ओ अंतावा… हे प्रेक्षकांना जाम आवडले आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १४४ कोटींचा गल्ला गोळा केला आहे. यादरम्यान सामंथाने या आयटम नंबरसंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने सेक्सी होणे हे वेगळ्या प्रकारचे हार्डवर्क आहे, असे म्हटले आहे.
सामंथाने आयटम नंबरचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे, मी पॉझिटीव्ह रोल केले, निगेटीव्ह रोल केले, कॉमिक रोल केले. सीरिअस रोल देखील केले. मी एका चॅट शोची होस्टही होती. मी ज्या व्यक्तिरेखा साकारत असते त्यातील परफेक्शनसाठी खूप मेहनत घेत आहे, परंतु सेक्सी होणे एक वेगळ्या लेव्हलचे हार्डवर्क होते. ओ अंतावा… साठी आपण दिलेल्या प्रेमाबद्दल आभार!
‘पुष्पा : द राइज’चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून, या चित्रपटात अल्लू अर्जुन
व्यतिरिक्त रश्मिका मंदानाही लीड रोलमध्ये दिसून येत आहे. ओ अंतावा… हे गाणे गणेश आचार्य आणि देवी श्री प्रसाद यांनी कोरिओग्राफ केले आहे.