ई-व्हेरिफिकेशनसाठी २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदत
नवी दिल्ली – आयकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या करदात्यांनी आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये आयकर विवरणपत्राचे आतापर्यंत ई-व्हेरिफिकेशन केले नाही, असे करदाते ही प्रक्रिया २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पूर्ण करू शकतात, असे आयकर विभागाने म्हटले आहे. आयकर विभागाच्या या निर्णयामुळे अनेक करदात्यांना दिलासा मिळणार आहे. नियमांनुसार, डिजिटल स्वाक्षरीशिवाय, इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपात आयकर विवरणपत्र दाखल करण्यावर त्याचा आधार ओटीपी, नेटबँकिंग, डिमॅट खात्याद्वारे पाठवण्यात आलेला कोड व्हेरिफाय करावा लागतो. हे ई-व्हेरिफिकेशन आयकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर १२० दिवसांमध्ये करावे लागते. त्याशिवाय करदात्यांना बंगळुरूमधील सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर (सीपीसी) आयटीआर कार्यालयात एक प्रत पाठवून व्हेरिफिकेशन करता येऊ शकते. ही व्हेरिफिकेशन प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही, तो पर्यंत आयकर विवरण दाखल केले नाही, असे म्हटले जाते.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …