‘आयएनएस वेला’ पाणबुडी आज नौदलात सामील होणार

मुंबई – देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने युद्धनौका आणि पाणबुडींच्या बांधकाम क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करीत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी ‘आयएनएस विशाखापट्टणम’ भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली आणि आता नौदलाला कलवरी वर्गाची चौथी पाणबुडी ‘आयएनएस वेला’ ही मिळणार आहे. ही पाणबुडी गुरुवारी (२५ नोव्हेंबर) नौदलात दाखल होणार आहे. ‘आयएनएस विशाखापट्टणम’ ही युद्धनौका पूर्णपणे स्वदेशी आहे.
‘आयएनएस वेला’ मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे तयार करण्यात आली आहे. यापूर्वी ‘आयएनएस कलवरी’, ‘आयएनएस खांदेरी’ आणि ‘आयएनएस करंज’ भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत. या सर्व पाणबुड्या फ्रेंच स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुडीच्या तंत्रज्ञानावर बनवण्यात आल्या आहेत, ज्या जगातील सर्वोत्तम पाणबुड्या मानल्या जातात. ‘आयएनएस वेला’ ७५ मीटर लांब आणि १६१५ टन वजनाची आहे. यात ३५ नौसैनिक आणि ८ अधिकारी बसू शकतात. ही पाणबुडी समुद्राखाली ३७ किलोमीटर (२० नॉटिकल मैल) वेगाने धावू शकते. ही पाणबुडी समुद्राखालून एका फेरीत १०२० किमी (५५० नॉटिकल मैल) अंतर कापू शकते आणि ५० दिवस समुद्रात राहू शकते. शत्रूच्या जहाजांवर हल्ला करण्यासाठी ‘आयएनएस वेला’मध्ये १८ टॉर्पेडो आहेत. याशिवाय, ३० सागरी बोगदेही बनवता येऊ शकतात, ज्यामुळे शत्रूच्या जहाजांवर हल्ला करून ती नष्ट करता येतील. ही पाणबुडी क्षेपणास्त्रांनीही सुसज्ज आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …