आयआयएफएल वेल्थ मुंबई बुद्धिबळ : अरविंद अय्यर सबसे आगे

खुल्या गटात विजयाचा षटकार ठोकणारा एकमेव खेळाडू
मुंबई – आयआयएफएल वेल्थ मुंबई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या खुल्या गटात १८ वे मानांकन असलेल्या अरविंद अय्यरनेसहाव्या फेरीत विजयाचा षटकार ठोकत गुण तालिकेत 6 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. खुल्या गटाचे चित्र बदलले असून पदाची माळ कुणाच्याही गळ्यात पडू शकते. विक्रमादित्यनेबुधवारी सहावी फेरी खेळत विजयासह स्पर्धेतील आपलेही आव्हान कायम राखले आहे. तो पाच गुणांसह एकूण सहा खेळाडूंसह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे तर श्रयन मजूमदार आणि अर्जुन आदिरेड्डी ५.५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत.
कुलाबा येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये सुरू असलेल्या मुंबई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या खुला आणि ज्यूनियर अशा दोन्ही गटात १३ वर्षाखालील मुलांनीच जबरदस्त खेळ दाखवला आहे. ज्यूनियर गटात अव्वल पाच खेळाडूंत असलेले अरविंद अय्यर, अर्जुन आदिरेड्डी हे खुल्या गटातही अव्वल पाच खेळाडूंत असल्यामुळे यापैकी एका खेळाडूने जेतेपदाचा डबल धमाका केला तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. अरविंद अय्यरने सलग सहाव्या डावात विजय नोंदवताना रित्विक कृष्णनला पराभूत केले. दोघेही प्रारंभी खूप सावध खेळत होते पण पुढे रित्विकने काही चाली खेळत अरविंदला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. अरविंदनेरित्विकला हरवताना खुल्या गटात सलग विजयांची मालिका कायम राखणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.
दुसऱ्या पटावर अर्जुन आदिरेड्डी आणि श्रयन मजूमदार यांच्यातला संघर्ष 60 चालीनंतर बरोबरीत संपला. तिसऱ्या पटावर खेळताना विक्रमादित्य कुलकर्णीने स्पर्धेत जोरदार परतताना रघुराम रेड्डीला सहज नमवत मी अजूनही शर्यतीत असल्याचे दाखवून दिले. विक्रमादित्यने सहाव्या फेरीत पाचव्या विजयाची नोंद केली. अरविंद प्रमाणे विक्रमादित्यही अपराजित आहे. विक्रमादित्यच्या अनुपस्थितीमुळे या गटात जेतेपदासाठी आता जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या तीन फेऱ्या अजून शिल्लक असून कोणताही खेळाडू बाजी मारू शकतो. विक्रमादित्य पाच गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असला तरी रित्विक कृष्णन, रचित गुरनानी, प्रकाश बजाज, संजीव मिश्रा आणि विरेश शरणार्थी हे पाच खेळाडूसुद्धा पाच गुण मिळवून संयुक्तपणेतिसऱ्या क्रमांकावर आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …