ठळक बातम्या

आम्हाला मुख्यमंत्री भाजपचा हवाय, ‘लगान’ ची टीम नको – नारायण राणे

कणकवली – राज्य सरकारची लायकी फक्त पोस्टर्स लावण्यापुरती आहे, आम्हाला मुख्यमंत्री भाजपचा हवाय, ‘लगान’ची टीम नको असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडीला शुक्रवारी लगावला. जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बँक निवडणुकीत माझ्या विरोधात महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र आले, पण मी त्यांना पुरून उरलो. जिल्हा बँक निवडणुकीनंतर आता राज्याकडे लक्ष असून राज्यात भाजपची सत्ता आणणार. आम्हाला मुख्यमंत्री भाजपचा हवाय, ‘लगान’ची टीम नको. ते पुढे म्हणाले की, गेल्या चार दिवसांत कोकणात काय काय घडले? त्याची संपूर्ण माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देणार आहे. पोलीस कसे वागले, कोर्टात काय झाले आणि पत्रकारांनी कसे कव्हरेज केले, जे काही अनुभवायला मिळाले, त्याची सर्व माहिती अमित शहांना देणार, असे राणेंनी स्पष्ट केले. पत्रकारांशी संवाद साधण्याच्या सुरुवातीला ते म्हणाले की, ही सत्ता माझी नाही. भाजपची सत्ता आली आहे. जिल्ह्यातील देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादाने ही सत्ता आली आहे. माझे कार्यकर्ते आणि नितेश राणेंनी घेतलेली मेहनत. राजन तेली आणि निलेश राणेंनी त्यांना दिलेली साथ यामुळे हा विजय मिळवला. हा विजय मिळवताना अकलेचा वापर झाला. अक्कल ज्याला आहे, त्याच्या ताब्यात देवदेतांनी बँक दिली. नितेश आणि निलेशसह कार्यकर्त्यांना हे श्रेय आहे. आता आम्ही महाराष्ट्राच्या सत्तेकडे पाहणार आहोत, असे राणे यांनी सांगितले. आता आमचे लक्ष्य महाराष्ट्र सरकार आहे. तिकडे आमची सत्ता नाही. थोडक्यात हुकली. महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांची आणि चांगल्या सत्तेची गरज आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री नाही. अजून अडीच वर्ष आहे विधानसभा निवडणुकीला. तिन्ही जिल्ह्यातील विधानसभा आणि खासदार हा भाजपचाच असेल. ज्यांचे चेहरे पाहवत नाही अशा लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून आमचा जिल्हा ठेवणार नाही, असा टोला त्यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना लगावला. ते पुढे म्हणाले की, गड आला की सिंह गेला यापेक्षा आम्ही असे राजकारणी आहोत की गड न जाऊ देता आम्ही सत्ता जिंकतो. आमची दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे राजन तेलींची आम्ही वर्णी लावणार. आम्ही वाया जावू देणार नाही. आम्ही मविआच्या लोकांना जागा दाखवली आहे, असे सांगतानाच राजन तेलींचा राजीनामा वरिष्ठांकडे दिला आहे. तो निर्णय वरिष्ठ घेतील. जो निर्णय घेतली तो मान्य असेल. ही काय शिवसेना नाही, असा टोला त्यांनी लगावला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …