आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट

  • अनेक चर्चांना उधाण

मुंबई – सातारा जिल्हा बँकेची नुकतीच निवडणूक पार पडली. त्यानंतर आता सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाची निवड होणार आहे आणि त्यासाठी राजकीय नेत्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून, याच काळात सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांची शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत चर्चा केली आहे. इतकेच नाहीतर आपल्याला अध्यक्षपद मिळावे अशी इच्छाही शिवेंद्रराजेंनी शरद पवारांकडे व्यक्त केली असल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी शिवेंद्रराजे भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली होती. बँकेच्या अध्यक्षपदासाठी आपण इच्छूक असल्याचे शिवेंद्रराजेंनी त्यावेळी अजित पवारांना म्हटल्याचेही वृत्त समोर आले आहे. अध्यक्षपदासाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित पवार आणि शरद पवारांकडे इच्छा व्यक्त केली, तर या निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळेच आपला पराभव झाला असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला होता. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …