कोल्हापूर – कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (अण्णा) यांचेगुरुवारी पहाटेनिधन झाले. आमदार जाधव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्यावर हैद्राबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. आजारपणामुळेगेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सर्वच पक्षातील नेत्यांशी जाधव यांचेजिव्हाळ्याचेसंबंध होते. चंद्रकांत जाधव यांनी निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्येप्रवेश केला होता.२०१९ मध्येझालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकटावर निवडून आले होते. गेल्या आठ दिवसांपासून चंद्रकांत जाधव यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र गुरुवारी पहाटे त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या उद्योग जगतात नावालौकिक मिळावीला होता. पूर्वाश्रमीचे फुटबॉल खेळाडू, फुटबॉलखेळाचा पाठीराखा म्हणून त्यांची ओळख होती. साधी राहणी आणि लोकात मिसळण्याचा स्वभावामुळे ते लोकप्रिय होते. त्यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांना त्यांच्या फुफ्फुसाला संसर्ग झाला होता. त्यावर स्थानिक रुग्णालयात एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू त्यांना हैदराबाद मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान रक्तदाब कमी झाल्याने त्यांचे निधन झाले.
दरम्यान, मुळचे खेळाडूअसलेल्या आमदार जाधव यांनी खिलाडूवृत्तीने आपली वाटचाल केली. त्यामध्येउद्योजकता आणि राजकारण यांचा समतोल सांभाळला. विधीमंडळातील एका उमद्या सहकाऱ्याचेअसे अवेळी निघून जाणेक्लेशदायक आहे. जाधव यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. अशा शब्दात मुख्यमंर्त्यांनी आमदार जाधव यांना श्रद्धांजली वाहिली.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रिय नेतृत्व, जनतेशी घट्ट नाळ असलेला लोकप्रतिनिधी, विधिमंडळातील अभ्यासू सहकारी, जिल्ह्यातलं क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांचं निधन ही महाविकास आघाडीची मोठी हानी आहे. मी आणि आम्ही सर्वजण जाधव कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …