आबिद अलीवर पार पडली अँजियोप्लास्टी

कराची – पाकिस्तानचा कसोटी सलामी फलंदाज आबिद अलीवर अँजियोप्लास्टी पार पडली. त्याने कायदे आझम ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती, ज्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. हृदयरोग विशेषज्ज्ञांच्या वतीने अनेक चाचण्या पार पडल्यानंतर असे समोर आले की, आबिद ‘एक्युट कोरोनरी सिंड्रोम’ने ग्रस्त असून त्याच्या हृदयातील रक्त प्रवाह अचानक कमी झाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सूत्र म्हणाले की, त्याच्यावर अँजियोप्लास्टी पार पडली. त्याच्या एका नसमध्ये स्टेंट टाकले गेले. रुग्णालयातून सुट्टी मिळण्याआधी आणखीन एक छोटी प्रक्रिया पार पडेल. कायदे आझम ट्रॉफीमध्ये मध्य पंजाबच्या वतीने खैबर पखतूनख्वा संघाविरुद्ध खेळणाऱ्या आबिदने दोन वेळा छातीत दुखत असून, खांद्येही दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर संघाचे व्यवस्थापक अशरफ अलीने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. आबिद तेव्हा ६१ धावांवर खेळत होता. आबिदने बुधवारी रुग्णालयातून आपल्या चाहत्यांना संदेश पाठवत आपण ठीक असल्याचे सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …