प्रियांकाने आपला राग संपूर्ण जगासमोर व्यक्त केला आहे आणि त्याला कारण ठरले आहे ते म्हणजे तिची निक जोनसच्या पत्नीच्या रूपात करून दिलेली ओळख! खरेतर प्रियांकाने आपल्या हिंमतीवर स्वत:ची अशी ओळख जगभरात निर्माण केली आहे. मात्र असे असले तरी तिला लोक तिच्या नावाने नव्हे, तर निक जोनसची पत्नी म्हणून हाक मारत असल्याने ती खूप हैराण परेशान झाली आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर तिने अशा रिपोर्ट्सवर निशाणा साधला आहे.
प्रियांकाने इंस्टावर लिहिले आहे,’खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की, मी जगातील सर्वात आयकॉनिक फ्रेंचाईजीला प्रमोट करत आहे आणि मला आजही कुणाची तरी पत्नी म्हणून ओळखले जातेय. याशिवाय एका न्यूजचा आणखी एक स्क्रीनशॉट शेअर करत प्रियांकाने विचारणा केली आहे की ‘प्लीज सांगा हे सर्व आजही महिलांबरोबर कसे काय होत आहे? मला माझ्या बायोमध्ये आयएमडीबी लिंक ॲड करण्याची गरज आहे का? या पोस्टमध्ये प्रियांकाने आपला पती निक जोनस यालाही टॅग केले आहे.
अलीकडेच प्रियांका आणि निक जोनस यांच्या घटस्फोटाच्या अफवांना ऊत आला होता, परंतु प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी हे वृत्त साफ खोटे असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच प्रियांका-निकनेही सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त करत लोकांची बोलती बंद केली होती.