आदित्य ठाकरेंना धमकी; आरोपीला अटक

सायबर सेलने केली अटक
सुशांतसिंह राजपूतचा फॅन असल्याचा दावा

मुंबई – राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाºया व्यक्तीला मुंबई क्राइम ब्रांचच्या सायबर सेलने अटक केली आहे. जयसिंह राजपूत, असे या अटक केल्याला आरोपीचे नाव आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करून आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा चाहता असल्याचा दावा त्याने स्वत: केला आहे.
आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाºयाला बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून धमकी देणाºया जयसिंग राजपूतला अटक करण्यात आली. हा आरोपी ३४ वर्षांचा असून, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून अटक करण्यात आली आहे.

बंगळुरूहून अटक करण्यात आलेला आरोपी जयसिंग राजपूत याने ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ च्या सुमारास सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवला होता. त्या मेसेजमध्ये त्याने सुशांतसिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले होते. त्यानंतर त्याने तीन फोनही केले. आदित्य ठाकरेंनी ते फोन उचलले होते. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसा मेसेज त्याने आदित्य ठाकरेंना पाठवला होता. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३४ वर्षीय आरोपी जयसिंग राजपूतला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला. त्यावेळी आरोपी बंगळुरू येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार बंगळुरू येथून राजपूत याला अटक करण्यात आली आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …