
The Centers for Disease Control and Prevention calls the patch a “game-changer” and is helping the team at Georgia Tech make it work against a range of germs.
नाशिक – ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढलेली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभाग लसीकरणावर भर देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता आरोग्य विभागाकडून नीडल फ्री अर्थात विनासुई लसीकरणाचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. नीडल फ्री लसीकरणासाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागाकडून नीडल फ्री लसीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमात झायकोव्ह-डी ही नीडल फ्री लस दिली जाणार आहे. जळगाव आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना आठ लाख डोस मिळणार आहेत. झायकोव्ह-डी लसीचे २८ दिवसांच्या अंतराने तीन डोस देण्यात येणार आहेत. लसीकरणाला देशभरात वेगात सुरुवात झाली. यामध्ये पहिला डोस घेणाºयांची संख्या सर्वाधिक आहे, मात्र त्या तुलनेत दुसरा डोस घेणाºयांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. दुसरा डोस घेण्याबाबतचा निरुत्साह दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाकडून लसीकरणासाठी जनजागृती करून लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.
झायडस कॅडिला कंपनीची झायकोव्ह-डी ही लस नीडल फ्री देण्यात येणार आहे. म्हणजेच सुईविना लस आता नागरिकांना दिली जाणार आहे. ज्या नागरिकांना सुईने लस घेण्यासाठी भीती वाटते, अशा नागरिकांसाठी ही लस वरदान ठरणार आहे. पुढील काही दिवसांत या लसीचे वितरण नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत करण्यात येणार आहे. त्यानंतर लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस आणि त्यानंतर तिसरा डोस ५६ दिवसांनी घ्यायचा आहे. नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांत हा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे. त्यानंतर येथील प्रतिसाद पाहून राज्यातील इतर भागांत नीडल फ्री लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.