ठळक बातम्या

आता समीर वानखेडेंच्या पेहरावावर नवाब मलिकांचा निशाणा

मुंबई – नवाब मलिकांनी मंगळवारी पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी नवा बॉम्ब फोडताना नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे ७० हजारांचे शर्ट वापरतात, १ लाख रुपयांची पँट वापरतात आणि २ लाख रुपयांचे शूज वापरतात.

नवाब मलिकांनी म्हटले की, समीर वानखेडेंचे सर्व फोटो तुम्ही पाहा. त्यांचे बूट पाहा. लुईस व्युट्टोनचे बूट दोन-दोन, तीन-तीन लाखांचे आहेत, ते जे बदलत असतात. त्यांचे शर्ट पाहाल, तर त्यांची किंमत ५० हजारांपासून सुरू होते. टी शर्ट पाहिलं, तर त्याची किंमत ३० हजार रुपयांपासून सुरू होते. वानखेडेंच्या हातातील घड्याळं दररोज बदलतात, ज्यांची किंमत २० हजारांपासून सुरू होते, ती १ कोटीपर्यंत किमतीची आहेत. एका प्रमाणिक अधिकाऱ्याचे हे राहणीमान? मी प्रार्थना करतो की, देशातील सर्व प्रामाणिक लोकांचं राहणीमान असंच व्हावे. ते पुढे म्हणाले, समीर वानखेडेंचे शर्ट ७० हजारांचे का आहे? दररोज नवे शर्ट घालून का येतात? वानखेडे तर मोदींपेक्षाही पुढे निघाले. पँट लाख रुपयांची, पट्टा दोन लाखांचा, शूज अडीच लाखांचे, तर घड्याळे २० लाखांची, २५ लाखांची. जे कपडे समीर वानखेडेंनी या दिवसांत घातले आहेत, त्यांची किंमतच कोट्यवधी रुपयांची आहे. खरंच, प्रामाणिक अधिकारी १० कोटींचे कपडे परिधान करू शकतो. कोणतंही शर्ट त्यांनी पुन्हा घातलेलं आम्ही पाहिले नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …