आता रेल्वेतही महिलांना आरक्षित सीटची सुविधा

मुंबई – रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांना आता आरामदायी प्रवास करता येणार आहे. बसप्रमाणे रेल्वेमध्येही महिलांना आरक्षित सीटची सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच घोषणा केली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महिला प्रवाशांसाठी आता रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये आरक्षित सीटची सुविधा उपलब्ध होणार आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यामध्ये महिलांसाठी आरक्षित सीट असायला हव्यात, अशी मागणी केली जात होती. आता त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे बस किंवा मेट्रोमधून प्रवास करताना महिलांसाठी आरक्षित सीटची सुविधा असते. सीट आरक्षित असल्याने महिलांना प्रवासामध्ये कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत. याच धर्तीवर आता रेल्वेमध्ये देखील महिलांना आरक्षित सीटचा लाभ घेता येणार आहे. लांब पल्ल्याच्या मेलमध्ये स्लीपर कोचमध्ये महिलांसाठी सहा बर्थ आरक्षित असणार आहेत. थ्री टिअर एसी डब्यामध्ये देखील महिलांसाठी सहा बर्थ आरक्षित करण्यात आले आहेत. आरक्षित सीट पैकी लोअर सीट हे प्राधान्याने ज्येष्ठ महिला आणि गर्भवती महिला यांना देण्यात येणार असल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …