फास्ट फूड खाताना तुम्ही अनेकदा विचार कराल की ते खाणे चांगले आहे, पण वजन आणि आरोग्याच्या दृष्टीने ते वाईट आहे. अशा स्थितीत फास्ट फूड खाऊनही तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. हे जर तुम्हाला कळले तर तुम्हाला हे ऐकून खूप आनंद होईल,नाही का? चला तुम्हाला अशी चांगली बातमी देऊया.
आता फास्ट फूड खायला कोणाला आवडत नाही? ती गोष्ट वेगळी की, लोक वजन वाढण्याच्या भीतीने त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत मॅकडोनाल्डने चीनमधील शांघाय शहरातील लोकांना एक वेगळी भेट दिली आहे. त्यांनी लोकांचे वजन वाढण्याची समस्या दूर केली आहे. आणि असा उपाय शोधला आहे की, बर्गर लोकांसाठी आरोग्यदायी असल्याचे सिद्ध होईल.
खरे तर, मॅकडोनाल्ड्सने चीनमधील त्यांच्या काही केंद्रांमध्ये बर्गर खाण्याच्या आसनांसह व्यायामाची मशीन्स जोडली आहे. त्यामुळे लोकांना बर्गर खाताना व्यायाम करता येणार आहे. यावेळी इंटरनेटवर यासंबंधीचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक फास्ट फूड खाण्यासोबतच व्यायाम करताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ चीनच्या शांघाय शहरातील आहे. व्हिडीओमध्ये एक महिला बर्गर खाताना सायकल चालवताना दिसत आहे. बर्गर खाल्ल्यानंतर प्रथम महिला कोल्डड्रिंकची चुस्की घेते आणि नंतर फिटनेस मशीनवर सायकलिंगमध्ये गुंतते. @ं’५्रल्लाङ्मङ्म नावाच्या युझरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये वापरकर्त्याने लिहिले की, ‘टूऊङ्मल्लं’’ि२ रँंल्लॅँं्र ‘ॠी३ र’्रे’ टीं’.’
फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, मॅकडोनाल्ड चीनमध्ये दोन ठिकाणी अशी ‘ग्रीन चार्जिंग बाईक’ वापरण्याचा प्रयत्न करत आहे. मॅकडोनाल्डने सप्टेंबर २०२१ मध्ये ग्वांगडोंग प्रांतातील जियांग वांडा रेस्टॉरंटमध्ये आपल्या ग्राहकांना प्रथम व्यायाम बाइक सादर केल्या. आता शांघायमधील एका रेस्टॉरंटमध्येही ही सुविधा ग्राहकांना दिली जात आहे. सोशल मीडियावरही लोक या पद्धतीला खूप पसंत करत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून त्यांनी या कल्पनेचे कौतुक केले आहे.