पुणे – ओमिक्रॉनचा धोका वाढल्यानंतर राज्य सरकारसह स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. ओमिक्रॉनचा रुग्ण भारतात आढळल्यापासून कोरोनाचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. ओमिक्रॉनचा व्हेरिएंट येण्यापूर्वी जिल्हापालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठक घेत शहरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी पुण्यातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण क्षमतेने आयोजित करण्यास परवानगी दिली होती. त्यासाठी कोरोनाचे आवश्यक ते निर्बंध पाळण्यासही त्यांनी सांगितले होते, मात्र त्यानंतर भारतात ओमिक्रॉनचा रुग्ण सापडल्याने राज्य सरकारने कोरोनाच्या नियमावलीत बदल केले. त्यानंतर हे आदेश मागे घेण्यात आले.
– या नियमांचे करावे लागेल पालन
- यापुढे परदेशातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट विमानतळावरच केली जाणार आहे.
– त्याचबरोबरा परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला सात दिवस घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे. - शहरातील लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणार आहे.
- शहरातील सरकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक असेल.
- कोरोना नियमांची अंमलबजावणी करणे सक्तीचे असले.
- प्रत्येक नागरिकाला मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. विना मास्क सापडल्यास त्या व्यक्तीकडून ५०० रुपये दंड आकारला जाईल.
- याबरोबरच शहरातील सांस्कृतिक ठिकाणे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहांसह केवळ बंदिस्त जागेतच ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहता येईल.
- लग्नांसारख्या कार्यक्रमांना केवळ ५० टक्के उपस्थितीस परवानगी आहे.
- खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी केवळ २५ जणच हजर राहू शकणार आहेत.
- आस्थापनाधारकास नियम न पाळल्यास दहा हजार रुपयांचा होणार दंड आकारण्यात येणार आहे.