ठळक बातम्या

आता नारायण राणेंना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा

नवी दिल्ली – केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राणेंना केंद्राने झेड सुरक्षा दिली आहे. यापूर्वी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. त्यामुळे राणे यांना आता दोन ऐवजी आठ जवानांची सुरक्षा असणार आहे. नारायण राणेंना यापूर्वी वाय दर्जाची सुरक्षा होती, मात्र ठाकरे सरकारने राणेंना रत्नागिरीत अटक केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने राणेंच्या सुरक्षेचा आढावा घेत त्याबाबतचा अहवाल मागितला होता. त्यानंतर राणेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना वायवरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. आधी राणेंच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफचे दोन कमांडो होते. आता त्यांची संख्या वाढून आठ झाली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …