आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टाक्रॉन – ब्रिटनमध्ये समोर आली प्रकरणे

लंडन – कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरातील आरोग्य तज्ज्ञांना चिंतेत टाकले आहे. या व्हेरिएंटचे नाव डेल्टाक्रॉन आहे. हा डेल्टा आणि ओमिक्रॉन मिळून समावेश असलेला एक संकरित स्ट्रेन आहे, जो गेल्या महिन्यात सायप्रसमधील संशोधकांनी पहिल्यांदा शोधला होता. त्यावेळी शास्त्रज्ञांना ही प्रयोगशाळेतील तांत्रिक चूक वाटत होती; पण आता ब्रिटनमध्ये काही प्रकरणे समोर आली आहेत.
सध्या ब्रिटनची यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी या व्हेरिएंटवर लक्ष ठेवून आहे. त्यांच्यामते, कोरोनाच्या या स्ट्रेनचा तपास केला जात आहे. हा व्हेरिएंट किती संसर्गजन्य आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत, याबद्दल एजन्सीने कोणतीही माहिती दिलेली नाही.
डेल्टा व्हेरिएंट जगभरात अत्यंत घातक असल्याचे सिद्ध झाले असले, तरी ओमिक्रॉनच्या संसर्गाचा प्रसार आतापर्यंत आढळलेल्या इतर सर्व प्रकारांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. अलीकडेच भारताला ओमिक्रॉनच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही व्हेरिएंटना जागतिक आरोग्य संघटनेने व्हेरिएंट आॅफ कन्सर्न म्हणून घोषित केले आहे.
सायप्रस विद्यापीठातील संशोधकांनी ७ जानेवारी रोजी हा रिपोर्ट नोंदवला. त्याला डेल्टाक्रॉन, असे नाव दिले. जैवतंत्रज्ञान आणि आण्विक विषाणूशास्त्र प्रयोगशाळेचे प्रमुख आणि जैविक विज्ञानाचे प्राध्यापक लिओनडिओस कोस्ट्रिकिस यांच्या नेतृत्वाखालील टीमने याचा शोध लावला. त्यावेळी, सायप्रसमध्ये डेल्टाक्रॉनची २५ प्रकरणे नोंदवली गेली. प्रोफेसर कोस्ट्रिकिस यांच्या म्हणण्यानुसार, सायप्रसमधील २५ लोकांपैकी ज्यांमध्ये नवीन स्ट्रेन आढळला, ११ लोकांना कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी, उर्वरित १४ लोक असे होते, जे कोविड पॉझिटिव्ह होते, परंतु त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते.
एका महिन्यापूर्वी, जगभरातील शास्त्रज्ञांनी असा युक्तिवाद केला की, ओमिक्रॉन दुसºया प्रकाराशी इतक्या लवकर एकत्र करून नवीन प्रकार तयार करू शकत नाही. लंडनमधील इम्पीरियल कॉलेजचे विषाणूशास्त्रज्ञ टॉम पीकॉक म्हणाले की, डेल्टाक्रॉन ही लॅबमधील तांत्रिक चूक होती, न की नवा स्ट्रेन. प्रतिसादात, प्रोफेसर कोस्ट्रिकिस यांनी लॅब एरर असल्याचा डेल्टाक्रॉनचा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले की, डेल्टाक्रॉनचे नमुने एकापेक्षा जास्त देशांमध्ये जीनोम अनुक्रमित केले गेले होते आणि जागतिक डेटाबेसमध्ये सादर केलेल्या इस्रायलमधील किमान एक क्रमाने डेल्टाक्रॉनचे अनुवांशिक गुणधर्म दिसून आले.
या प्रकारावरील अभ्यास सुरुवातीच्या टप्प्यात आहे. डेली मेलशी बोलताना ब्रिटनचे डॉ. पॉल हंटर म्हणाले की, डेल्टाक्रॉनपासून आम्हाला जास्त धोका नसावा, कारण बहुतेक लोकांना लस आणि बुस्टर डोस मिळाला आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉन विरुद्ध यूकेमध्ये रोग प्रतिकारश्क्ती आधीच विकसित झाली आहे. सध्या, या प्रकाराबद्दल काळजी करण्यासारखे काही नाही.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …