मुंबई – मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) इस्टर्न फ्री वे ठाणेपर्यंत पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते ठाणे प्रवास करणाऱ्यांना याचा चांगलाच फायदा होईल. सध्या इस्टर्न फ्री वे चेंबुरला संपतो. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा औपचारिक निर्णय घेण्यात आला.
दक्षिण मुंबईपासून सुरू होणारा फ्री वे शिवाजी नगर, चेंबुर येथे संपतो; पण ठाण्याच्या दिशेच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. दक्षिण मुंबई ते चेंबुर आणि घाटकोपर या मध्य उपनगरांमध्ये वाहतूक जलद होण्यासाठी फ्री वेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे; मात्र पूर्व उपनगरांमध्ये पुढे जाणाऱ्या वाहनांना चेंबुर जंक्शनजवळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री देखील आहेत. ते इस्टर्न फ्री वे ठाण्यापर्यंत नेण्याच्या योजनेचे पहिल्यापासून समर्थन करत होते. छेडा नगर ते आनंद नगरपर्यंत फ्री वेचा विस्तार करण्याची योजना आहे. तेथून पुढे आनंद नगर ते साकेतदरम्यान एलिवेटेड रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. घोडबंदर रोडला बायपास करण्यासाठी मार्ग असेल. कोपरी-पाटणी पूल आणि खारेगाव बायपास रस्त्यालाही बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. खारेगाव बायपासमुळे कळवा, विटावा, खारेगाव या भागांतील वाहतूक कोंडी कमी होईल.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …