आणखीन एका एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; म्हणून उचलले टोकाचे पाऊल!

नाशिक – राज्यभर पेटलेला एसटी आंदोलनाचा वणवा भडकत असून, नाशिक जिल्ह्यातल्या पेठ आगारातील एका चालकाने कमी पगारामुळे आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गहिनीनाथ गायकवाड असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गायकवाड यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचे समजते. दुसरीकडे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आंदोलन अजून तीव्र केले असून, लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

नाशिक आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन जोरात सुरू आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले असून, त्यांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या ५१ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस पाठवली आहे. आतापर्यंत ८५ हून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. आता नोटीस पाठविलेल्या कर्मचाऱ्यांना चोवीस तासांच्या आत कामावर या, अन्यथा कारवाई करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून, आंदोलन पुन्हा चिघळण्याची शक्यात निर्माण झाली आहे. यात अनेक कर्मचारी कमी पगार आणि घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने टोकाचे पाऊल उचलत आहेत. पेठ आगारातील चालक गहिनीनाथ गायकवाड यांनी या आर्थिक कोंडीतूनच आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …