नवी दिल्ली – केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी केल्यानंतर डिझेल १० आणि पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर लागोपाठ आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सलग आठ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. महिनाभर इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनतेला हैराण केले होते. मागील आठ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
भारतीय तेल कंपन्यांनी ३ नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. शुक्रवारी मुंबईत पेट्रोलची किंमत १०९.९८ रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत ९४.१४ रुपये प्रति लिटर इतकी होती. तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत १०३.९७ रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत ८६.६७ रुपये प्रति लिटर इतकी होती. तर चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.४० रुपये प्रति लिटरने आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत ८९.७९ रुपये आणि पेट्रोल १०४.६७ रुपयांनी विकले जात आहे.