ठळक बातम्या

आज कोण जिंकणार? भारत-न्यूझीलंडमध्ये दुसरी अटीतटीची लढत

रांची – शुक्रवारी राजस्थानमधील जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियमवर न्यूझीलंडविरोधात होणाऱ्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्ये विजयासह तीन सामन्यांची मालिका आपल्या नावे करण्याच्या इराद्याने भारत उतरणार आहे. मात्र, तरीही भारतीय संघाला आपल्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. न्यूझीलंड संघालाही आपल्या फलंदाजांसह गोलंदाजांकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी आपल्या जोडीची चांगली सुरुवात करताना बुधवारी जयपूर येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंड संघाला ५ गडी राखून पराभूत केले. भारताच्या या विजयात पहिल्या फळीतील फलंदाजांची शानदार कामगिरी आणि गोलंदाजांनी केलेली नियंत्रित गोलंदाजी या बाबींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या विजयाने भारताने न्यूझीलंड विरोधातीलसर्व फॉरमॅटमधील सलग सात पराभवांचा क्रम तोडला. अडीच आठवड्यांच्या आवश्यक ब्रेकआधी रोहित रांचीतच मालिका जिंकण्याच्या निर्धारात आहे. जेणेकरून कोलकाता येथील अंतिम सामन्यात युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकेल. सध्याच्या मालिकेमधून विराट कोहलीला विश्रांती दिली गेली आहे. त्याची जागा सूर्यकुमार यादवने घेतली आहे. त्याने ४२ चेंडूंमध्ये ६२ धावा केल्या. श्रेयस अय्यर व ऋषभ पंत यांनी मात्र काहीशी निराशा पदरी टाकली. मात्र यजमान भारतीय संघाने फलंदाजीदरम्यान सामन्यावरील नियंत्रण कदापि गमावले नाही. श्रेयसने आठ चेंडूंमध्ये पाच धावा काढल्यानंतर १९व्या षटकात टिम साउथीच्या चेंडूंचा बळी ठरला. भारतासाठी सूर्यकुमार यादवची फलंदाजी निर्णायक ठरली. भुवनेश्वर कुमार आणि रविचंद्रन अश्विन यांनीही गोलंदाजीचे चांगले प्रदर्शन केले. शुक्रवारी दोन्ही संघांमध्ये दुसरा अटीतटीचा सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण कोण जिंकणार याबद्दल क्रिकेटरसिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत सध्या तरी भारताचे पारडे एका विजयाने वर आहे. उर्वरित सामन्यांमध्येही भारताची हीच कामगिरी कायम राहते का याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. दोन्ही संघांसाठी ‘नाणेफेक’ आणि त्यानंतर घेतला जाणारा फलंदाजी अथवा गोलंदाजीचा निर्णय कितपत पथ्यावर पडतो हे सामना संपल्यानंतर स्पष्ट होईल. सायंकाळी ७ वाजता हा सामना सुरू होणार आहे.
संघांमध्ये ‘या’ खेळाडूंचा समावेश
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर. अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज. न्यूझीलंड : टिम साउथी (कर्णधार), टॉड ॲस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, ॲडम मिल्ने, डेरिल मिशेल, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनर, टिम सीफर्ट आणि ईश सोढी.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …