ठळक बातम्या

आजपासून वेळापुरात राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेला सुरुवात

मुंबई- ५७ वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा वेळापूर (ता. माळशिरस), सोलापूर येथील पालखी मैदानावर शनिवार ११ ते सोमवार १३ डिसेंबर या कालावधीत रंगणार आहे.
खो-खो चे आधारस्तंभ व महाराष्ट्र खो खो संघटनेचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर. हा दिवस महाराष्ट्रात खो-खो दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त या राज्य स्पर्धेचे आयोजन वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ यांच्या वतीनेआणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने केले आहे.
कोरोना महामारीमुळे या स्पर्धा कोरोनाच्या शासकीय सर्व नियमांचे पालन करून घेण्यात येत आहे. पुरुष व महिला गटाच्या विभागीय साखळी स्पर्धेतून विजयी व उपविजयी झालेले प्रत्येकी सोळा-सोळा संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे हि स्पर्धा बाद पध्दतीने होइल. तीन दिवस होणाऱ्या या स्पर्धेसाठी पालखी मैदानावर खो खोची तीन क्रीडांगणे करण्यात आली असून या स्पर्धा सकाळ आणि सायंकाळ / रात्री विद्युतझोतात होतील. येथे प्रेक्षकांसाठी भव्य गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार ११ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होईल. यावेळी भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष महेश गादेकर, सरचिटणीस गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर तसेच महाराष्ट्र व सोलापूर खो खो असोसिएशन विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

असे होणार बाद फेरीचे सामने
पुरुष – मुंबई उपनगर विरुद्ध बीड, सिंधुदुर्ग विरुद्ध अहमदनगर, मुंबई विरुद्ध पालघर, रत्नागिरी विरुद्ध ठाणे, सांगली विरुद्ध जळगाव, नाशिक विरुद्ध सोलापूर, उस्मानाबाद विरुद्ध सातारा, नंदुरबार विरुद्ध पुणे.
महिला – पुणे विरुद्ध नाशिक, धुळे विरुद्ध सोलापूर, औरंगाबाद विरुद्ध सातारा, पालघर विरुद्ध उस्मानाबाद, रत्नागिरी विरुद्ध रायगड, मुंबई विरुद्ध सांगली, अहमदनगर विरुद्ध मुंबई उपनगर, जालना विरुद्ध ठाणे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …