सिंधुदुर्ग – कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ पुन्हा काबीज करावा, यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेयांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या मतदारसंघातून शुक्रवारी याच पार्श्वभूमीवर कुडाळ येथे भाजप कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी नारायण राणेयांनी आपल्या पराभवाचा उल्लेख करत येणाऱ्या निवडणुकीत गद्दारी मी सहन करणार नाही, असा सज्जड दम कार्यकर्त्यांना भरला.
कुडाळ शहरातील महालक्ष्मी हॉल येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्याचेशुक्रवारी आयोजन करण्यात आलेहोते. भाजप प्रदेश सरचिटणीस, आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेश सचिव निलेश राणे, राजन तेली यावेळी उपस्थित होते.
या मेळाव्याला मार्गदर्शन करताना नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज होण्यास सांगितलं व स्पष्ट शब्दांत इशाराही दिला. येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत गद्दारी, फितुरी मी सहन करणार नाही. माझ्या निवडणुकीत जे झालं ते मी सहन केले, पण आगामी निवडणुकीत जर कुणी गद्दारी केली… याला पाडा… याला अमूक करा, तमूक करा…असे उद्योग केले तर पाहाच…गद्दाराला पक्षातून काढून टाकणं सोपं आहे पण नकोत्या गोष्टी घडू नयेत याची काळजी सगळ्यांनी घ्या. गद्दारी मला नाही चालणार… मी ती चालूदेणार नाही’, असा दमच राणेयांनी भरला. मला काय गरज आहे या सगळ्याची. मी घरी आरामात राहू शकतो. माझे व्यवसाय चांगले चालू आहेत’, असे सांगताना केवळ पक्षासाठी मी काम करत आहे, असे राणे म्हणाले. पक्ष तुम्हाला सगळं काही देतो, मग पक्षाचंहित जपणं तुमचं कर्तव्य नाही का? हा जिल्हा शंभर टक्के नारायण राणेयांच्यासोबत आहेहे तुम्ही दाखवून द्या. येणाऱ्या निवडणुका जिंकून राणेंच्या जिल्ह्यात शंभर टक्के भाजप आहे, हा संदेश पक्ष नेतृत्वापर्यंत जायला हवा, असे आवाहनही राणे यांनी केले. निलेश राणे यांनी यावेळी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. २०२४ मध्ये मलाही येथून जिंकायचे आहे. पुढच्या निवडणुकीत मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असेही राणे यांनी आश्वस्त केले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
3 comments
Pingback: ไลค์แฟนเพจ
Pingback: https://www.heraldnet.com/reviews/phenq-reviews-is-it-legit-update/
Pingback: bio ethanol burner