ठळक बातम्या

आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरेंचा दौरा सुरू

मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेने चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी राज ठाकरे दौरे आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. सध्या मुंबई, पुणे आणि नाशिककडे मनसेने जास्त लक्ष केंद्रित केले आहे, तर राज ठाकरे औरंगाबादचा दौराही करणार आहेत. या निवडणुकीत मनसेला चांगल्या यशाची अपेक्षा आहे.
सर्वात आधी राज ठाकरे नाशिकचा दौरा करणार आहेत. त्यासाठी ते नाशिकला रवाना झाले आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता नाशिक मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश होणार आहे. नाशिकच्या दौऱ्यानंतर ते औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. औरंगाबादेतही ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मंगळवारी राज ठाकरे औरंगाबादेत सकाळी १० वाजता मराठवाड्यातील पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता सागर लॉन येथे दिलीप चितलांगे यांच्या वतर्मान पत्राचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते पुण्याकडे रवाना होणार आहेत. १५ आणि १६ डिसेंबरला ते पुण्यातल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी १७ डिसेंबरला सकाळी १० वाजता कोंढवा, पुणे येथील साईनाथ बाबर यांच्या ई लर्निंग शाळेचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकींच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. त्याचा मनसेला आगामी निवडणुकीत किती फायदा होतो?, हे निवडणुकांनंतरच कळेल. महापालिका निवडणुकांसाठी भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीसही मैदानात उतरले आहेत. मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या, मात्र काही कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …