आगामी ‘अंडर-१९’ विश्वचषकासाठी बीसीसीआयने जाहीर केला भारतीय संघ

मुंबई – तब्बल चार वेळा अंडर-१९ विश्वचषक विजेता ठरलेला भारतीय संघ सर्वात यशस्वी अंडर-१९ संघ असून, आगामी २०२२च्या अंडर-१९ विश्वचषकासाठीही भारत सज्ज झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्विट करीत भारतीय संघ जाहीर केला. भारतीय क्रिकेटच्या कनिष्ठ निवड समितीने वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या २०२२ च्या अंडर-१९ विश्वचषकासाठी ही संघ निवड केली असून, यावेळी कर्णधारपद दिल्लीच्या यश धुल याच्याकडे सोपवण्यात आले आहे.
आगामी १९ वर्षांखालील विश्वचषक वेस्ट इंडिजमध्ये १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत पार पडणार आहे. यंदाचा हा १४ वा विश्वचषक असून, यावेळी एकूण ४८ सामन्यांमध्ये १६ संघ चषकासाठी एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. आतापर्यंत अंडर-१९ विश्वचषकाच्या इतिहासात भारत सर्वात जास्त विजय मिळवण्यात यशस्वी झाला आहे. भारताने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ मध्ये विश्वचषक जिंकला होता. २००० साली मोहम्मद कैफच्या, २००८ मध्ये विराट कोहलीच्या, २०१२ मध्ये उन्मुक्त चंदच्या आणि २०१८ मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने ही स्पर्धा जिंकली होती. तर २०१६ आणि २०२० मध्ये झालेल्या विश्वचषकात भारत उपविजेता ठरला आहे.
यांचा समावेश
यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, एसके रशिद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्य यादव (यष्टीरक्षक), राज अंगद बावा, मानक पारख, कौशल तांबे, आरएस हंगरगेकर, वासू वॅट्स, विकी ओत्सवाल, रवी कुमार, गर्व सांगवान.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …