आखिर क्यो?

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता हिचे आयुष्य नेहमीच गूढमय वाटत आले आहे. शोबिजच्या लाइमलाइटपासून कायम दूर राहणारी श्वेता नंदा ही तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिने डिझाइनर मोनिशा जयसिंग बरोबर मिळून आपले फॅशन लेबल एमएक्सएच लाँच करत फॅशन जगतात एंट्री केली, परंतु आता लोकांना भलतीच चिंता भेडसावत आहे. श्वेता नंदा ही आपला पती निखिल नंदा याच्यासोबत न राहता आपल्या मातापित्याकडे का राहत आहे, हा प्रश्न आता लोकांना छळू लागला आहे.
श्वेता ही आपला पती आणि सासरच्या मंडळींपासून दूर जरी राहत असली तरी याचा अर्थ असा मुळीच नाहीयं की, तिने आपल्या पतीला डिव्होर्स दिला आहे किंवा त्यांच्याबाबत श्वेताला काही प्रॉब्लेम्स आहेत. मुळात श्वेता आणि निखिल नंदा हे दोघे वेगवेगळ्या प्रोफेशनमधील आहेत. साहजिकच दोघांना वेगवेगळे राहावे लागते. इतकचे नव्हे तर निखिल नंदा हे एस्कॉर्ट ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, तर श्वेता एक रायटर, फॅशन डिझाइनर आणि मॉडेल आहे. श्वेताला नेहमीच आत्मनिर्भर बनायचे होते. त्यामुळे ती आपल्या पतीच्या पैशांवर अवलंबून राहत नाही. तिच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, परंतु असे असूनही ती स्वत: काम करते आणि आपल्या मुलांचा सांभाळ करते. श्वेताने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी विवाह केला होता आणि आपल्या वैवाहिक आयुष्याकरिता तिने अन्य सर्व गोष्टी बाजूला सारल्या होत्या, परंतु लग्नानंतर दहा वर्षांनी श्वेताने स्वत:चे करिअर बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्याकरिता तिला दिल्लीहून मुंबईला शिफ्ट व्हावे लागले. मुंबईत तिचे माता-पिताही आहेत. त्यामुळे साहजिकच कोणत्याही लहानन-मोठ्या प्रसंगी श्वेता जलसावर आपली उपस्थिती दर्शवते. थोडक्यात सांगायचे तर श्वेताच्या वैवाहिक आयुष्यावर टीका-टिप्पणी करणाऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाहीयं. कारण श्वेताने आपल्या पतीला घटस्फोट दिलेला नाहीयं आणि तिच्यावर तिचा पती आणि सासरची मंडळी ही कायमच खूश आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …